@mdkva/surahkit
Version:
MDKVA SurahKit provides clean, reliable, and easily accessible Quran data ideal for apps, Islamic tools, AI systems, and automation projects.
32 lines • 4.06 kB
JSON
[
{
"id": "1",
"surah": "The Opener",
"verses": "1-7",
"text": "अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार आहे. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा."
},
{
"id": "103",
"surah": "The Decline Day",
"verses": "1-3",
"text": "काळाची शपथ. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला."
},
{
"id": "112",
"surah": "The Sincerity",
"verses": "1-4",
"text": "तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे. अल्लाह निरपेक्ष आहे. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे."
},
{
"id": "113",
"surah": "The Daybreak",
"verses": "1-5",
"text": "तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासूनही. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील."
},
{
"id": "114",
"surah": "The Mankind",
"verses": "1-6",
"text": "तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो. लोकांच्या स्वामीच्या आणि लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या आश्रयात. मनात कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो. मग तो जिन्नांपैकी असो किंवा माणसांपैकी."
}
]